इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात कडकडीत बंद….

10

इंदापूर, १२ सप्टेंबर २०२० : जगभरासह देशात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. महाराष्ट्रमधील पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी इंदापूर शहर आणि संपूर्ण तालुका पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या.

याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नागरिकांना कोरोनामुळे नियम आणि अटी पाळण्याचे आवाहन देखील केले होते तसे न केल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा इशारा देखील दिला होता. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे प्रमाण अधिकच होत असल्याने नागपूर शहरासह ग्रामीण भागामध्ये आठ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला शनिवार पासून(दि.१२) सुरू होणा-या जनता कर्फ्यू मध्ये तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

यामध्ये बिजवडी येथील व्यापारी संकुल परिसर लोणी देवकर येथील बाजारपेठ तसेच न्हावी येथील बाजारपेठ आदी ठिकाणी गावातील प्रमुख बाजारपेठा नागरिकांनी बंद ठेवून प्रशासनास सहकार्य केले. जनता कर्फ्यू मधून प्रामुख्याने अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. तालुक्यातील नागरिकांनी अगदी काटेकोरपणे जनता कर्फ्यूचे पालन केले.

न्यूज अन कट प्रतिनिधी- निखिल कणसे.