इंदापूर, दि. १३ सप्टेंबर २०२०: नागरिकांना मोफत वाफ घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केअर सेंटर उपजिल्हा रुग्णालय इंदापूर पोलीस ठाणे काही ठिकाणी चौकात आंबेडकर नगर आदी ठिकाणी वाफेचे यंत्र बसविण्यात आले आहेत.
वाढता कोरोना प्रसार रोखण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी नागरिकांना मोफत वाहून घेण्याची सोय व्हावी ह्या उद्देशाने मोफत वाफेचे यंत्र बसविण्यात आले असल्याचे नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी सांगितले.
यावेळी पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे, पोलिस उपनिरीक्षक गणेश लोकरे, ठाणे हवालदार मोहिते, प्रा.अशोक मखरे, माजी नगरसेवक अविनाश मखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट: प्रतिनिधी निखिल कणसे