भारतात सलग दोन दिवस ८२,००० पेक्षा जास्त रूग्ण बरे

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर २०२०: भारतात गेल्या दोन दिवसांत कोवीड -१९ चा संसर्ग झालेले रूग्ण मोठ्या संख्येने बरे झाल्याचे दिसून आले आहे. या दोन दिवसांत तब्बल ८२,००० पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

गेल्या २४ तासात ८२,९६१ सक्रिय रूग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे बरे होणाऱ्या रूग्णांच्या राष्ट्रीय सरासरीतही वाढ होऊन ती ७८.६४% इतकी झाली आहे.

आतापर्यंत एकूण ४९ लाखापेक्षा जास्त (४०,२५,०७९) रूग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रूग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रूग्णांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त (३०,१५,१०३) असून चार पटीने जास्त आहे.

बरे झालेल्या रूग्णसंख्येतील वाढीमुळे गेल्या ३० दिवसांतील बरे झालेल्या रूग्णांच्या सरासरीतही १००% वाढ झाली आहे. बरे झालेल्या एकूण रूग्णांपैकी एक पंचमांश पेक्षा जास्त अर्थात १७,५५९ (२१.२२%) रूग्ण महाराष्ट्रातील असून त्या खालोखाल आंध्र प्रदेशमधले १०,८८५, कर्नाटकमधील ६५८०, उत्तर प्रदेशमधील ६४७६ आणि तमीळनाडूमधील ५७६८ असे ३५.८७% रूग्ण बरे झाले आहेत. या सर्व राज्यांमधील एकूण ५७.५१% रूग्ण बरे झाले आहेत.

आज घडीला देशातील एकूण सक्रिय रूग्णांच्या संख्येने १० लाखाचा (१०,०९,९७६) टप्पा ओलांडला आहे. यातील सुमारे निम्मे (४८.८५%) सक्रिय रूग्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये आहेत. तर या राज्यांबरोबरच उत्तर प्रदेश आणि तमीळनाडू, अशा पाच राज्यांमध्ये सुमारे ६०% सक्रिय रूग्ण आहेत.

देशभरात गेल्या २४ तासात कोरोना संसर्गामुळे ११३२ जण दगावले आहेत. यात महाराष्ट्रातील ४७४ जणांचा समावेश असून दगावलेल्या एकूण रूग्णांपैकी ४०% पेक्षा जास्त रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेश (८६), पंजाब (७८), आंध्र प्रदेश (६४) आणि पश्चिम बंगाल (६१) अशा चार राज्यांमधील २५.५% रूग्ण गेल्या २४ तासांत दगावले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा