रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून कोव्हिड १९ योद्धांसाठी अनोखा उपक्रम

दुबई, १७ सप्टेंबर ,२०२०: आयपीएल चे १३ वे सत्र येत्या काही दिवसात सुरू होत आहे. अवघ्या दोनच दिवसावर आयपीएल येऊन ठेपली आहे. क्रिकेट रसिक आयपीएलची खूप वाट पाहत आहेत. अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आयपीएल भारताबाहेर खेळवावी लागतेय. संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आहे. जगावर असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचं गांभीर्य पाहता रॉयल चॅलेंजर बंगळूरू संघाने कोरोना योद्ध्यांसाठी एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे.

रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा संघ यंदाच्या सिजनमध्ये कोरोना वॉरियर्सचा अनोख्या पद्धतीने सन्मान करणार आहे. संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुरूवारी त्यासंदर्भातील घोषणा केली. या संपूर्ण स्पर्धेत आरसीबीच्या खेळाडूंच्या जर्सीवर ‘माय कोव्हीड हिरोज् ‘ असे लिहिलेले पाहायला मिळणार आहे

याविषयी माहिती देताना विराट म्हणाला, “कोरोना वॉरियर्ससाठीच्या या स्तुत्य उपक्रमात एक टीम म्हणून आम्ही प्रथमच सहभागी होतोय. कोरोना व्हायरसच्या संकटात ज्या ज्या व्यक्तींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांची सेवा केलीये त्यांच्यासाठी हा उपक्रम त्यांना समर्पित आहे. ही जर्सी परिधान करताना आम्हालाच अभिमान वाटतोय.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा