कोरोना महामारी नंतर पहिल्यांदाच फिफा रँकिंग जाहीर, प्रथम स्थानी बेल्जियम

क्रीडा,१८ सप्टेंबर ,२०२०: कोरोना व्हायरस मुळे सर्वच खेळ थांबले होते. त्यात फुटबॉल स्पर्धा ही थांबविण्यात आल्या होत्या. तसेच सप्टेंबर महिन्यापासून फुटबॉल स्पर्धांना सुरुवात करण्यात आली आहे. आणि कोरोना महामारीनंतर गुरुवारी पहिल्यांदाच फिफा पुरुष वर्ल्ड रँकिंग जाहीर करण्यात आली. यात पाच महिन्यानंतर ही बेल्जियम संघ प्रथम स्थानी कायम आहे. रँकिंगच्या पहिल्या चार स्थानांमध्ये काहीच बदल नाही आहेत. यात बेल्जियम नंतर २०१८ विश्व विजेता संघ फ्रान्स , ब्राझील आणि इंग्लंड संघ यांचा समावेश आहे.

युरोपीय आणि यूएफा नेशन्स लीग विजेते पोर्तुगाल संघ दोन पाय-या वर सरकत पाचव्या स्थानी विराजमान झाले आहेत. तसेच फिफा डिसेंबर च्या सुरुवातीला २०२२ विश्व कपसाठी युरोपीय क्वालीफाइंग ग्रुप ठरवणार आहेत.

टॉप १० रँकिंग मधील युरोपीय संघांना फायदा होणार आहे ज्यात फक्त विजेते संघ कतार मध्ये होणाऱ्या फायनल टुर्नामेंटमध्ये सरळ क्वालीफाय होणार आहे. त्यानंतर तीन आणखी संघ मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या प्ले ऑफच्या माध्यमातून क्वालीफाय करणार आहेत. तसेच कतार हा संघ रँकिंग मध्ये ५५ व्या स्थानी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा