नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२०: जर आपण पेटीएम अॅप देखील वापरत असाल तर ही बातमी आपल्याला त्रासदायक ठरू शकते, कारण लोकप्रिय मोबाइल पेमेंट अॅप पेटीएम गुगल प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आलाय. यानंतर वापरकर्ते हे अॅप डाउनलोड करण्यास सक्षम नाहीत. प्ले स्टोअर वर पेटीएम शोधल्यानंतर सध्यातरी पेटीएम चे इतर ॲप जसे की पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मनी, पेटीएम मॉल अद्याप प्ले स्टोअरवर अस्तित्त्वात आहेत. याशिवाय सध्याच्या स्थितीला ॲप्स स्टोअरवर हे अजूनही उपलब्ध आहे.
पेटीएम केवळ गुगल प्ले स्टोअर वरून काढलं गेलं आहे, परंतु आपण आयफोन वापरकर्ते असल्यास अॅप स्टोअरमध्ये अद्याप हे अॅप अस्तित्त्वात आहे. तथापि, गुगल प्ले स्टोअर वरून पेटीएम काढण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. गुगलनं हा निर्णय का घेतला याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगता येत नाही.
तथापि, जर पेटीएम आपल्या फोनमध्ये आधीपासून अस्तित्वात असेल तर आपण ते वापरू शकता. या अॅपच्या मदतीनं केवळ रिचार्ज केलं जात नाही तर लहान ते मोठ्या पेमेंट साठी, शॉपिंग आणि गुंतवणूकीपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीसाठी या अॅपचा भरपूर वापर केला जातो.
गूगल प्ले स्टोअर वरून पेटीएम काढून टाकल्याचं सांगत पेटीएमनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून वापरकर्त्यांना हे स्पष्ट केलंय की ते गुगल प्ले स्टोअर वर काही काळ डाउनलोड आणि अपडेट करण्यासाठी उपलब्ध नाही. पण, लवकरच आम्ही परत येऊ. यासह कंपनीनं असं ही म्हटलं आहे की, वापरकर्त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि आपण लवकरच त्याचा वापर करण्यास सक्षम असाल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे