पुणे, १९ सप्टेंबर २०२०: कोरोना साथीच्या आजारामुळं, मोठ्या संख्येनं लोक सध्या पैशांच्या समस्येशी झगडत आहेत. यामुळं, या कठीण काळात वैयक्तिक कर्ज घेऊन बरेच लोक त्यांच्या पैशा संबंधित संकटांवर मात करण्याचा विचार करीत आहेत. अशा परिस्थितीत वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) हे एक शस्त्र म्हणून वापरलं जातं, ज्याची वेळोवेळी मदत घेतली जाऊ शकते. विशेषत: जेव्हा आपल्याला रोख रक्कम हवी असते तेव्हा आपण वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. परंतु गृह कर्जे आणि वाहन कर्जासह अन्य कर्जापेक्षा या कर्जाचा व्याज दर जास्त आहे. जेव्हा आपल्याला कर्ज दिलं जातं तेव्हा त्यात बरेच घटक गुंतलेले असतात. उदाहरणार्थ, ग्राहक कर्जाची रक्कम देण्यास सक्षम असेल की नाही, ग्राहक कोणत्या कंपनीत काम करत आहे याची सर्व माहिती कर्ज देताना बघितली जाते.
कर्ज घेताना ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा असतो. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर जास्त असणं महत्वाचं आहे. आपला क्रेडिट युटिलाइजेशन रेशो ३० टक्के ठेवून एक चांगला क्रेडिट स्कोअर बनवला जाऊ शकतो.
कर्ज घेण्यापूर्वी ग्राहकानं विविध कर्ज दाता बँकांकडून वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोनवर किती व्याज आकारलं जात आहे हे तपासणं गरजेचं आहे. बऱ्याच बँका वेळोवेळी वैयक्तिक कर्जावर व्याजामध्ये सवलत देत असतात.
जर आपल्याला कमी व्याजदराचं वैयक्तिक कर्ज हवं असल तर या आधीचा आपला हप्ता फेडण्याविषयीचा तपशील देखील चांगला असायला हवा. ग्राहकानं त्याच्या क्रेडिट कार्डची बिलं पूर्ण भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि दरमहा त्याचं कर्ज फेडलं पाहिजे. अशा वेळी ग्राहकाला कमी व्याजदराचं वैयक्तिक कर्ज मिळू शकेल.
असं सांगितलं जातं की सुप्रसिद्ध कंपन्या तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन जास्त व स्थिर असतं. तसेच अशा कर्मचाऱ्यांचा कर्ज फेडण्याचा इतिहास देखील चांगला असतो त्यामुळं अशा लोकांना देखील कमी वेळात पर्सनल लोन उपलब्ध होऊ शकतं.
या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला देशाच्या काही निवडक बँकांकडून दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जांबद्दल सांगत आहोत.
युनियन बँक- ८.९०%-१२%
स्टेट बँक ऑफ इंडिया ९.६०%-१३.८५%
पंजाब नॅशनल बँक ८.९५%-११.८०%
बँक ऑफ बडोदा १०.२५%-१५.६०%
एचडीएफसी बँक १०.७५%-२१.३०%
आयसीआयसीआय बँक ११.२५%-२१%
एक्सिस बँक १२%-२४%
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे