दिल्ली: येस बँकेमध्ये १.२ बिलियन डॉलरची गुंतवणूक होणार आहे. ही गुंतवणूक अमेरिकेतील एका व्यवसायिक परिवाराकडून येणार आहे. काल रात्री बँकेने या बातमीची पुष्टी केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारास कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये जागा मिळू शकते. कारण एवढी मोठी गुंतवणूक जर बँकेमध्ये होत असेल तर बँकेला बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये गुंतवणूकदारास जागा देणे अनिर्वाय ठरणार आहे १.२ बिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये ८४६२ करोड रुपये इतकी रक्कम होते.
बँकेमध्ये येणारी ही गुंतवणूक डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता बँकेने वर्तवली आहे म्हणजेच जास्तीत जास्त दीड ते दोन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. काल रात्री ही बातमी बँकेच्या एका च्च अधिकार्यांनी निश्चित केली. याआधीही बँकेने सांगितले होते की बँकेकडे ३ बी. डॉलारस एवढ्या मोठ्या रखण्यासाठी निरनिराळ्या गुंतवणूकदारांकडून ऑफर्स आले आहे. येणारी ही गुंतवणूक बँकेला पुढच्या दोन वर्षापर्यंत पुरेशी असेल असेही काल सांगण्यात आले. या गुंतवणुकीमुळे बँकेच्या लोन बुक मध्ये मोठ्या वर वाढ होणार असल्याची शक्यता आहे करण्यात आली. अमेरिकेकडून येणाऱ्या गुंतून उतारास बँकांच्या भागांमध्ये ३३ टक्के हिस्से दारी मिळणार आहे. ही हिस्से दरी खूप मोठी मानली जात आहे. येथे असे ही शंका निर्माण होते की बँकेच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी गुंतवणूकदारास तेवढाच मताधिकार मिळणार आहे का. यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की गुंतवणूकदारास केवळ पंधरा टक्के एवढंच मताधिकार राहील.