नोटांमधून वाढतोय कोरोना..? सरकारचं मौन उपस्थित करतायत अनेक प्रश्न…

नवी दिल्ली, २० सप्टेंबर २०२०: कोरोनामुळं, सरकारच्या मंत्र्यांवर आणि आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या सरकारी विभागांवरील कामाचा बोजा इतका जास्त आहे की, राष्ट्रीय स्तरावरील एखाद्या महत्वाच्या संस्थेनं कोरोना सारख्या संकटाशी लढण्यासाठी सरकारची एखादी तार्किक माहिती विचारली असता कोणत्याही नेत्याला किंवा सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना इतकाही वेळ नाही  की ६ महिन्यांत अनेक वेळा ती माहिती विचारूनही मंत्री आणि संबंधित संस्था माहिती देण्यास असमर्थ आहेत.

८ मार्च २०२० रोजी, अखिल भारतीय व्यापारी महासंघानं (कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र पाठवून चलन नोटांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो का? असा प्रश्न विचारला होता. त्याच वेळी, १५ मार्च २०२० रोजी कॅट’नं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) संचालक डॉ. बलराम भार्गव यांना आणखी एक पत्र पाठवलं होतं, त्यांनाही तोच प्रश्न विचारला गेला होता, परंतु ६ महिन्यांनंतरही इतका महत्वाचा प्रश्न जो देशातील कोट्यावधी व्यापाऱ्यांच्याच नव्हे तर देशातील अब्जावधी लोकसंख्येच्या आरोग्याशी निगडीत तर होताच पण, कोरोना काळातील महत्त्वाचा प्रश्न देखील होता. या प्रश्नाचे उत्तर देणं कुठल्याही मंत्र्याला किंवा आरोग्य संस्थेला महत्त्वाचं वाटलं नाही. दरम्यान, अनेकदा आरोग्य मंत्र्यांना आणि आयसीएमआरला वेळोवेळी आठवण देखील करून दिली पण कॅट अद्याप उत्तराची वाट पाहतच आहे.

 याबाबत सरकारचं मौन अत्यंत आश्चर्यकारक

देश आणि परदेशात बर्‍याच ठिकाणी या विषयावरील अनेक अभ्यास अहवालांमध्ये हे सिद्ध झालंय की, चलन नोटांमुळं कोणत्याही प्रकारचं संक्रमण वेगानं पसरतं, याचं कारण असं की, नोटांचा पृष्ठभाग कोरडा असतो आणि त्यामुळंच कोणतेही प्रकारचे व्हायरस किंवा बॅक्टेरिया बराच काळ नोटांवर जिवंत राहू शकतात. कारण, नोटांची देवाण-घेवाण अनेक लोकांमध्ये होत असते आणि या साखळीमध्ये कोणता व्यक्ती कोणत्या रोगानं ग्रस्त आहे हे सांगणं देखील कठीण आहे. त्यामुळं नोटांमधून कोणताही संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता दाट असते.

किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनऊ, जर्नल ऑफ करंट मायक्रोबायोलॉजी अँड एप्लाइड सायन्स, इंटरनेशनल जर्नल ऑफ फार्मा अँड बायो-सायन्स, इंटरनॅशनल जर्नल ऑफ ॲडव्हान्स रिसर्च इत्यादींनीही चलन नोटांच्या माध्यमातून संसर्ग झाल्याची पुष्टी केलीय. या दृष्टिकोनातून, कोरोना कालावधी दरम्यान चलन अत्यंत सावधगिरीनं वापरणं महत्वाचं आहे. परंतु, या प्रकरणी सरकारचं मौन अत्यंत आश्चर्यकारक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा