लडाख, २१ सप्टेंबर २०२०: दहा हजार फुटांवर असलेल्या रस्त्यावरील जगातील सर्वात मोठा बोगदा (रोड टनल) भारतात तयार झालाय. येत्या ३ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे उद्घाटन करणार आहेत. हिमाचल प्रदेशचे मंत्री व लाहौलचे आमदार रामलाल मार्कंडेय यांनी पंतप्रधान मोदींच्या आगमनासाठी तयारी सुरू केलीय. हा जगातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा कालावधी लागला आहे पण, या जगातील सर्वात मोठ्या बोगद्याच्या निर्माणामुळं आता संपूर्ण लडाख वर्षातील ३६५ दिवस पूर्णपणे जोडला जाईल. तसेच यामुळं मनाली ते लेह हे अंतर ४६ किलोमीटरनं कमी झालय. याचं नाव ‘अटल रोहतांग’ बोगदा असं आहे. हे नाव माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.
१०,१७१ फूट उंचीवर बांधलेला हा अटल रोहतांग बोगदा रोहतांग खिंडीला (रोहतांग पास) जोडून बनविण्यात आला आहे. हा जगातील सर्वात लांब आणि सर्वात उंच रस्ता बोगदा (टनल) आहे. हा सुमारे ८.८ किमी लांबीचा बोगदा बनवला गेला आहे. त्याचबरोबर या बोगद्याची रुंदी दहा मीटर इतकी आहे. आता मनाली ते लेह हे अंतर ४६ किलोमीटरने कमी झालंय. म्हणजेच आता आपण हे अंतर केवळ दहा मिनिटांमध्ये पार करू शकतो.
मनाली-लेह रस्त्यावर आणखी चार बोगदे प्रस्तावित आहेत, सध्या हा बोगदा पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरच्या शेवटी हे याचे उद्घाटन करतील असा अंदाज आहे. या बोगद्यामुळं मनाली केवळ लेहलाच जोडली जाणार नाही तर हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पितीमधील रहदारीही देखील सुलभ करेल.
लडाखमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याला या बोगद्याच्या निर्मितीचा सर्वाधिक फायदा होईल. यामुळं, शस्त्रास्त्र आणि रसद हिवाळ्यामध्ये देखील सहज पुरवल्या जातील. कारण हिवाळ्यामध्ये बर्फाने रस्ता अच्छादल्यामुळं ईथं सैनिकांसाठी अत्यावश्यक गोष्टींची ने-आण करणं अवघड होतं. याआधी केवळ जोजीला पास मार्गे सैनिकांपर्यंत रसद पुरवली जात होती. आता या मार्गामुळं सैनिकांना रसद पुरवता येणार आहे.
या बोगद्यात कोणतेही वाहन जास्तीत जास्त ८० किलोमीटर ताशी वेगानं धावू शकेल. या बोगद्याच्या कामाची सुरुवात सुरुवात २८ जून २०१० रोजी झाली होती. हा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’नं (बीआरओ) बनवलाय. हा बोगदा घोड्याच्या नाळेच्या आकाराचा बनवलेला गेलाय.
बीआरओच्या अभियंत्यांनी व कर्मचार्यांनी हा बोगदा बनविण्यात खूप मोठे परिश्रम घेतले आहेत. कारण, हिवाळ्यात या भागात काम करणं तेवढं सोपं नाही. इथलं तापमान वजा ३० अंश पर्यंत जायचे. या बोगद्याच्या निर्मितीदरम्यान ८ लाख घनमीटर दगड आणि माती काढण्यात आलीय. उन्हाळ्यात इथं दररोज पाच मीटर खोदकाम केलं जातं. पण, हिवाळ्यात ते केवळ अर्ध्या मीटरपर्यंतच खोदलं जात होतं.
हा बोगदा अशा प्रकारे तयार केला गेला आहे की एकाच वेळी ३००० कार किंवा १५०० ट्रक बाहेर येऊ शकतात. यासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपये खर्च झालाय. बोगद्याच्या आत अत्याधुनिक ऑस्ट्रेलियन टनल टेक्नॉलॉजी पद्धती वापरल्या गेल्या आहेत. वेंटिलेशन सिस्टम देखील ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानावर आधारित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे