ड्रग्स प्रकरणात सुहाना खान हिने व्यक्त केले आपले मत

नवी दिल्ली, २५ सप्टेंबर २०२०: बॉलिवूडमध्ये सध्या ड्रग्स प्रकरणाने चांगलाच जोर धरला आहे. सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर हे ड्रग्स चे प्रकरण उघडकीस आले आहे. आणि यात मोठ्या स्टार्सचाही समावेश आहे. रोज एकापाठोपाठ एक नवीन नावे समोर येत आहेत. यात सर्वात जास्त आश्चर्यचकित करणारे नाव म्हणजे दीपिका पादुकोण, रकुल प्रीत सिंग, श्रद्धा कपूर यांचे. या सर्व स्टार्सची चौकशी एनसीबीकडून सुरू आहे. या प्रकरणात सर्वच लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहे.
         
अशातच आज बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान हिने सोशल मीडिया वर एक पोस्ट शेअर केली आहे. आणि ती पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. सुहानाने आपल्या पोस्टमध्ये तिने महिलांबाबत होणाऱ्या चुकीच्या वागणुकीबाबत आपले विचार मांडले आहेत. सुहानाने नुकतेच इंस्टाग्रामवर इंग्रजी भाषेत एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिने लिहले, “मिसोगिनी, हे फक्त महिलांबद्दल रागच नाही तर महीलांबद्दल एक चुकीचा व्यवहार आहे. तुम्हाला हा विचार करायची गरज नाही आहे की तुम्ही महिलांबद्दल घृणा करता. खरं तर तुम्ही स्वतःला विचारा जेव्हा कोणतीही महिला असं काही करते. तर का तुम्हाला अस वाटतं की ते कोणत्याही पुरुषाने केलं असतं तर जास्त प्रतिक्रिया आल्या असत्या.
       
सुहाना खानने महीलांबाबत केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. सुहाना खान ही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती दररोज आपले नवनवीन फोटोस शेअर करत असते. तसेच व्हिडिओज ही शेअर करत असते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा