शाळा बंद विद्यार्थ्यांचं पण शिक्षण सुरूच,

धाराशिव, ३० सप्टेंबर २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत शाळा बंद असल्यातरी धाराशिव जिल्ह्यात उमरगा तालुक्यातल्या दाबका या गावी विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरूच आहे. गावातल्या सर्व भिंतीवर शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वैरागकर यांनी स्वखर्चानं असाच एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे.

विद्यार्थी शाळेत नाही तर आता शाळाच विद्यार्थ्यांपर्यंत ही संकल्पना घेऊन, मुलं जिथं दिवसभर खेळतात अशा ठिकाणी, म्हणजे गावातल्या सार्वजनिक भिंती, पाण्याच्या टाक्या अशा दर्शनी ठिकाणी त्यांनी सर्व विषयांचा अभ्यासक्रम, चित्र आकृत्या नकाशे यातून रेखाटला आहे.

यात भाषा विषयाचं व्याकरण, विज्ञानातले प्रयोग, सुत्रं ,आकृत्या,तक्ते भुगोलातले नकाशे, महाराष्ट्रातले किल्ले, नद्या, संतांची माहिती, गणिती सुत्रं,सिद्धांत,वेगवेगळ्या प्रकारची सामान्य माहिती, कोरोनाविषयक जनजागृती अशा प्रकारची माहिती वैरागकर यांनी कल्पकतेनं आणि स्वखर्चानं रंगवून घेतली आहे. गावातील मुले खेळता-खेळता हा अभ्यासक्रम वाचतात, अभ्यास करतात. पालकवर्गातूनही या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं स्वागत होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा