लखनऊ, ३० सप्टेंबर २०२०: ६ डिसेंबर १९९२ रोजी, रामनागरी अयोध्यामध्ये, वादग्रस्त बाबरी विध्वंस प्रकरणावर आज म्हणजेच बुधवारी निर्णय घेण्यात येईल. लखनौमधील जुन्या हायकोर्टाच्या इमारतीत विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश सुरेंद्र यादव सकाळी १०.३० वाजता आपला ऐतिहासिक निकाल देतील. या प्रकरणाचा निर्णय सुमारे चार हजार पानांवर लिहिला गेला आहे. या प्रकरणात ४९ जणांवर आरोप ठेवले गेले होते, त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झालाय. निकाल देताना न्यायाधीश सुरेंद्र यादव यांनी या प्रकरणातील ३२ आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत.
या प्रकरणात सीबीआय’नं एकूण ४९ जणांवर आरोप केले आहेत, ज्यात १७ जणांचा मृत्यू झालाय. आता या उर्वरित ३२ आरोपींविरूद्ध न्यायालय निर्णय देईल. सीबीआय न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांच्यासमोर या प्रकरणात एकूण ३५१ साक्षीदार हजर झाले. यासह, सुमारे ६०० कागदपत्रं देखील पुरावे म्हणून सादर केली गेली.
भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यासह मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री उमा भारती, भाजपा खासदार साक्षी महाराज, माजी खासदार विनय कटियार आणि रामविलास वेदांती यांच्यासह महंत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाळ, सरचिटणीस चंपत राय बंसल, साध्वी ऋतंभरा आणि आचार्य धर्मेंद्र हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. २८ वर्षांच्या दीर्घ सुनावणीदरम्यान आरोपी बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, विजयाराजे सिंधिया, आचार्य गिरीराज किशोर आणि विष्णू हरी डालमिया यांचं निधन झालंय.
हे आरोपी हजर असतील
आज या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कैसरगंजचे भाजपा खासदार चंपत राय बंसल, अयोध्याचे भाजपा खासदार ब्रिज भूषण शरण सिंह, उन्नावचे भाजप खासदार लखनू सिंह, उन्नावचे भाजपचे खासदार साध्वी ऋतंभरा, आचार्य धर्मेंद्र देव, रामचंद्र खत्री, सुधीर कक्कड़, ओ.पी. पांडे, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, संतोष दुबे आणि पवन पांडे उपस्थित असतील.
येण्याची खात्री नाही
अयोध्यामधील अनेक वादग्रस्त रचना विध्वंस करणारे आरोपी वयामुळं आणि अस्वस्थतेमुळं येऊ शकणार नाहीत. यामध्ये लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, कल्याण सिंग, महंत नृत्य गोपाल दास, उमा भारती आणि सतीश प्रधान यांचा समावेश आहे.
अयोध्येत सुरक्षा कडक केली
लखनौमधील सीबीआय’चे विशेष न्यायालय ३० सप्टेंबर रोजी अयोध्येत वादग्रस्त रचना विध्वंसबाबत निर्णय देईल. या निर्णयाबाबत अयोध्या जिल्हा प्रशासनही सतर्क आहे. येथे डीआयजी दीपक कुमार म्हणाले की, अयोध्येत सुरक्षा व्यवस्थेचे चोख बंदोबस्त आहेत. साध्या गणवेशातही पोलिस येथे तैनात असतील. उद्या भव्य तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे. येथे गर्दी जमण्याची परवानगी दिली जाणार नाही. यासह कोविड -१९ प्रोटोकॉल व कलम १४४ अनुसरण केले जातील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे