पुणे/आंबेगाव, १ ऑक्टोंबर २०२०: जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं रामोशी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावं या साठी व रामोशी समाजाच्या विविध मागण्या मान्य व्हाव्यात म्हणुन काल दि. ३० रोजी भिवडी (ता पुरंदर) येथून आंदोलनाला सुरवात झाली.
गेली अनेक वर्ष रामोशी समाजाला अनुसूचीत जमातीमध्ये आरक्षण मिळालं नाही तसंच रामोशी समाजाकडं इतर लोकांचा पाहाण्याचा दृष्टिकोण खुप वेगळा आहे, त्यामुळं या समाजाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असून अनुसूचित जाती जमाती सुधारित कायदा १९७६/३५ प्रमाणं महाराष्ट्रा मध्ये याची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यभर विविध ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतिनं या राज्यव्यापी आंदोलनाला सुरवात केली असून त्याची सुरवात काल पासून उमाजी नाईकांच्या जन्म स्थळापासुन करण्यात आलीय.
जर या समाजाच्या या मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीनं राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या घरा समोर उपोषणाला बसुन बोंब मारो आंदोलन केलं जाणार आसल्याचंही संघटनेच्या वतिनं सांगण्यात आलं. या वेळी संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे व सर्व रामोशी समाजाचे कार्येकरते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनीधी: साईदिप ढोबळे