नवी दिल्ली, ५ ऑक्टोंबर २०२०: दिल्ली नोएडा डायरेक्ट फ्लायवे (डीएनडी) वर हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात हाथरसला जात असताना प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचं एक चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यात एका पोलिसाचा हात प्रियंका गांधींचे कपडे पकडताना दिसत आहे. नोएडा पोलिसांनी या प्रकरणाची स्वत: दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यास नेमण्यात आलं असल्याचं नोएडा पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं की, व्हायरल झालेल्या फोटोमध्ये चेहरा दिसत नाही, म्हणून त्यावेळी पोलिस त्या फुटेजचा शोध घेत आहेत. पोलिस अधिकारी सांगतात की कोणत्या परिस्थितीत हा सर्व प्रकार घडला याचा तपास केला जात आहे.
इतकंच नाही तर रविवारी नोएडा पोलिसांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर डीएनडी उड्डाणपूलवर झालेल्या गैरवर्तनाबद्दल खेद व्यक्त केलाय. प्रियंका गांधी हाथरस येथे राहुल गांधी समवेत हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटूंबाची भेट घेण्यासाठी जात होते, त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं.
सोशल मीडियामधील व्हायरल फोटो
काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना रोखताना बरीच खळबळ उडाली होती. गोंधळाच्या वेळी एका पोलिस कर्मचाऱ्यानी प्रियंका गांधींचा कुर्ता पकडला, त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नोएडा पोलिसांनी आता याची दखल घेतली असून वरिष्ठ महिला अधिकाऱ्यानं चौकशीचे आदेश दिले आहेत.
विशेष म्हणजे गुरुवारी प्रियंका आणि राहुल गांधी सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हाथरसकडे जात होते, परंतु त्यांना ग्रेटर नोएडा एक्सप्रेस वेवर थांबविण्यात आले. पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतले. नंतर त्याला सोडण्यात आले. त्यानंतर हे दोन्ही काँग्रेस नेते पुन्हा दिल्लीत आले. संजय राऊत यांनी सुद्धा हे छायाचित्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत असा विचारला आहे की, नोएडा पोलिसांकडं महिला पोलीस कर्मचारी नाहीत का?
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे