हर्षवर्धन पाटील बारामतीतील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहणार

बारामती, ५ ऑक्टोबर २०२०: बारामती तालुक्यातील उंडवडी येथील कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील म्हणाले सरकार आज आहे तर उद्या नाही, बारामतीत भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर पोलिसात गुन्हे दाखल केले जात आहेत. पक्षस्तरावर याची दखल घेतली गेली आहे, याबाबत लवकरच पक्षीय पातळीवर काही तरी निर्णय होईल, अशी माहिती माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली. 

दरम्यान आपण बारामतीतील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे आहोत, अशी ग्वाही देण्यास पाटील विसरले नाहीत. बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सवलतीच्या दरात वस्तूवाटप, सेवाकार्य पुस्तिकेचे प्रकाशन व पदाधिकारी निवड असे उपक्रम पार पडले. या प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी वरील वक्तव्य केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी तालुका स्तरावर पक्षाची मोट बांधू अशी ग्वाही दिली, तर उंडवडीच्या श्री भैरवनाथ मंदीरातून परिवर्तनाची नांदी सुरु झाल्याचे प्रशांत सातव यांनी नमूद केले.

याप्रसंगी दादा सातव, प्रवीण काळभोर, सतीश फाळके, जी. बी. गावडे, गोविंद देवकाते, ज्ञानेश्वर माने, सचिन मलगुंडे, धनंजय गवारे, अभिजित देवकाते, प्रवीण आटोळे,युवराज तावरे, पोपटराव खैरे, अँड. जी. के. देशपांडे, सुधाकर पांढरे, भारत देवकाते आदी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा