जम्मू-काश्मिरात दहशतवादी हल्ला, नेत्याचा अंगरक्षक शहीद, एक आतंकवादी ठार

गांदरबल, ७ ऑक्टोंबर २०२०: मंगळवारी रात्री गांदरबलमध्ये दहशतवाद्यांनी भाजपचे जिल्हा उपप्रधान गुलाम कादिर आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार केला. या हल्ल्यात स्वत: जखमी असूनही, भाजप नेत्याच्या अंगरक्षकानं त्वरित कारवाई करून दोघांना वाचवलं आणि एक दहशतवाद्याला ठार केलं. अंगरक्षक इतर दहशतवाद्यांसमोर उभा राहिला, त्याचं धाडस पाहून इतर दहशतवादी आपला जीव वाचविण्यासाठी पळून गेले. त्याचवेळी जखमी अंगरक्षकाचा नंतर मृत्यूही झाला. सुरक्षा दलानं आजूबाजूच्या भागात घेराव घालून भाजप नेत्याच्या घरावर व्यापक शोधमोहीम राबविली.

मिळालेल्या माहितीनुसार सूर्यास्तानंतर रात्री आठच्या सुमारास गेंदरबालच्या नुन्नर भागात दहशतवाद्यांनी भाजप नेते गुलाम कादिर यांच्यावर हल्ला केला. गुलाम कादिर आपल्या आजारी पत्नीला डॉक्टरकडं घेऊन जात होते. जेव्हा ते त्यांच्या घराच्या गेटजवळ पोहोचले, तेव्हा दहशतवादी समोर आले. त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, परंतु त्याचा अंगरक्षक पोलिस हवालदार अल्ताफ हुसेन यानं दहशतवाद्यांपासून बचाव करत त्यांना वाचवलं. या दरम्यान अंगरक्षकाला गोळी लागून तो जखमी झाला आणि खाली पडला. परंतु, त्यानं दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली. सुमारे पाच मिनिटं दोन्ही बाजूने गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी एक अतिरेकी ठार झाला आणि त्याचे इतर साथीदार पळून गेले.

पोलिस कर्मचारीही घटनास्थळी पोहचले

गोळ्यांचा आवाज ऐकताच आसपासच्या भागात गस्त घालणारे सैन्य व पोलिस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. भाजप नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची व्यवस्था करीत असताना त्यांनी जखमी पोलिस अल्ताफ हुसेन यांना रुग्णालयात आणण्याची व्यवस्था केली, पण वाटेतच ते शहीद झाले. दरम्यान, सुरक्षा दलांनेही ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या इतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी त्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत शोध मोहिमही सुरू केली.

ठार दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, तो शब्बीर अहमद शाह असून तो दक्षिण काश्मीरमधील जगन्नालाड (पुलवामा) येथील रहिवासी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा