नवी दिल्ली, ८ ऑक्टोबर २०२० : भारत आणि जपान या दोन राष्ट्रांदरम्यान सायबर सुरक्षा विषयक सहकार्य करार करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे.
सायबरस्पेसची क्षमता वाढवणं, गुंतागुंतीच्या सुविधांना सुरक्षा, नव्या तंत्रज्ञानात सहकार्य, सायबर सुरक्षाविषयक धोके आणि अधम कार्यासाठीच्या वपारासंबंधीच्या माहितीची देवाण घेवाण आदी क्षेत्रात दोन्ही राष्ट्र एकमेकांना सहकार्य करतील.
भारतानं कॅनडाशी जिनोम बारकोडींग संदर्भात सहकार्याकरारही करायचं ठरवलं आहे.आरोग्याला हानीकारक अशा ७ अन्य रसायनांवर देशात बंदी घालण्याबाबतही मंत्रीमंडळानं निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बैठकीच्या अध्याक्षस्थानी होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी