चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावाजवळ काल एक वाघ दगडाखाली अडकला होता. बराच काळ त्याला वाचवण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न चालू असताना आज त्या वाघाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. काल सकाळपासून नदीत अडकलेल्या या वाघाला वाचवण्याचे प्रयत्न चालू होते.
काल वाघाला वाचवण्यासाठी प्रयत्न चालू असताना वाघ जखमी झाला होता. वाघाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता व या सर्वाला प्रतिसाद देत असताना वाघाच्या तोंडाला पिंजऱ्याचा सरावाच्या लागला. वाघाच्या तोंडाला झालेल्या या जखमेमुळे भरपूर प्रमाणात रक्त गेले होते. काही कालांतराने शरीरातून भरपूर रक्त गेल्या कारणाने वाघाची हालचाल थांबली होती. वनविभागाने वाघाला मृत घोषित केले.
नदीच्या पुलावर वाघ असताना समोरून येणाऱ्या दोन वाहनांच्या लाईटच्या उजेडामुळे हा वाघ गोंधळला व त्याने चाळीस फूट उंचीवरून नदीमध्ये दगडावर उडी मारली. हि उडी मारताना वाघ गंभीर जखमी झाला होता या सर्वाचाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जा भागांमध्ये वाघांचा वावर होत आहे आणि एवढ्या पहाटे भरधाव वेगाने वाहने पुलावरून जात असतील वाघांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन खरंच किती गंभीर आहे हा प्रश्न उद्भवतो. एकीकडे वाघांची संख्या कमी होत चालली आहे आणि दुसरीकडे निष्काळजीपणामुळे वाघांना अश्या नैसर्गिक मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.