नवी दिल्ली, ११ ऑक्टोंबर २०२०: शनिवारी चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात सुरू असलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान सट्टेबाजी करणाऱ्या १७ सट्टेबाजांवर नारकोटिक्स स्क्वॉड टीम आणि विशेष कर्मचार्यांच्या पथकानं अटक केली आहे. या सर्व सट्टेबाजांना देवळी गावातून अटक करण्यात आली आहे. जिथं हे सट्टेबाज लोक आयपीएल सामन्यादरम्यान सट्टा लावत होते.
त्यांच्याकडून रोख ८१,१०० रुपये, ६ वॉकी टॉकी, लॅपटॉप, मोबाईल फोन, टीव्ही, टाटा स्काय, इंटरनेट राउटर, पत्ते, जुगार चार्ट जप्त करण्यात आले आहेत.
याशिवाय सट्टेबाजीचे रॅकेट चालवणारे हे सट्टेबाज हे काम अत्यंत लबाडीनं करीत होते. पोलिसांना टाळण्यासाठी त्यांनी परिसरातील प्रत्येक रस्ता क्रॉसिंगवर आपल्या माणसांना ठेवलं होतं. जे त्यांना वॉकी टॉकीच्या माध्यमातून पोलिसांच्या हालचालीची माहिती देत असत. लॉकडाऊननंतर आयपीएल सुरू झाल्यानंतर ही टोळीही सक्रिय झाली होती. पोलिसांना या रॅकेटची माहिती मिळाली, त्यानंतर अंमली पदार्थांचे पथक आणि विशेष कर्मचारी यांची टीम देवळीला पोहोचली. जिथं वेगवेगळ्या मॉड्यूल’चे सट्टेबाज आयपीएल सामन्यांवर सट्टा लावत होते. नारकोटिक्स स्क्वॉड टीम आणि विशेष कर्मचार्यांच्या पथकानं सकाळी ९.४० वाजता छापा टाकला आणि १७ सट्टेबाजांना अटक केली.
देहरादूनच्या बँड बाजार खुडबुडा येथे घरी सुरू असलेल्या आयपीएल सट्टेबाजीच्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचवेळी दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. घटनास्थळावरून पोलिसांनी २५ लाखांची रोकड व सट्टेबाजीचं इतर साहित्य जप्त केलं आहेत. आरोपी अजय जयस्वाल याच्या घरी ही स्पोर्ट्स सट्टेबाजी चालू होती. जयस्वालला सट्टेबाजी व जुगार खेळल्याप्रकरणी यापूर्वीही तुरूंगात टाकण्यात आलं होतं.
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा चार लोक घरात बसले होते आणि ऑनलाईन सट्टा लावत होते. डीआयजी अरुण मोहन जोशी म्हणाले की, आरोपी मोबाइल फोनवरून सट्टेबाजी करीत असत. आयपीएलच्या सट्टेबाजीत एसटीएफनेही चार जणांना अटक केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे