एकनाथ खडसे तीन महिन्यांपासून संपर्कात: शरद पवार

  • भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या 3 महिन्यांपासून आपल्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. 
  • पवार यांच्या या वक्तव्यामुळे खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले आहे.
  • खडसे नाराज : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवार याद्यांमध्ये खडसे यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते नाराज असून अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत. 
  • नाराज खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार हे त्यांच्या भेटीसाठी जळगावला जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा