लडाख, १२ ऑक्टोंबर २०२०: लडाख सीमेवर भारत आणि चीनमधील सुरू असलेले तणाव अद्याप संपलेला नाही. दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर तैनात असून एकमेकांना सामोरे जात आहेत. दरम्यान, आज बर्याच दिवसानंतर दोन्ही देशांचे सैन्य अधिकारी टेबलावर असतील. १२ ऑक्टोबर रोजी भारत आणि चीन यांच्यातील चर्चेची सातवी फेरी सुरू होईल आणि त्यामध्ये सैन्य मागं घेण्याबाबत मंथन होऊ शकेल.
सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास पूर्व भागातील चुशुल भागात दोन्ही सैन्यामध्ये हे संभाषण होईल. मे महिन्यात तणाव निर्माण झाल्यानंतर जूनमध्ये हे संभाषण सुरू झालं, त्या दरम्यान अनेक वेळा सैन्य मागं घेण्यावर मंथन झालं, पण प्रत्येक वेळी चीननं या मुद्द्यावरून माघार घेतली.
आज भारत आणि चीनमधील संभाषणही खास आहे कारण भारताच्या वतीनं बोलणारे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात ही शेवटची चर्चा असंल. नवीन श्रीवास्तव, सह-सचिव (पूर्व आशिया), परराष्ट्र मंत्रालय देखील या बैठकीस उपस्थित राहतील. तसंच चीनमधील लष्करी अधिकाऱ्यां व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारीदेखील यात सहभागी होऊ शकतात.
यानंतर ही जबाबदारी लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांच्या हाती येईल. आतापर्यंत झालेली सर्व चर्चा लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केली होती.
या संभाषणात, पूर्व लडाखच्या संपूर्ण भागाबद्दल चर्चा व्हायला हवी, हा मुद्दा भारताकडून ठेवण्यात आला आहे. जेथे चिनी सैन्य दलाचे जवान तैनात आहेत आणि त्यांना काढलं जावं. पण, असं म्हटलं जात आहे की चीन फक्त पँगोंग लेकबद्दल बोलत आहे. भारत पुन्हा एकदा कठोरपणे आपले मुद्दे मांडेल, तसेच पाच महिन्यांपूर्वीची परिस्थिती पूर्ववत आणण्याविषयी चर्चा करेल.
विशेष म्हणजे पूर्व लडाखच्या आसपास पन्नास हजाराहून अधिक सैनिक तैनात आहेत. एप्रिल-मेनंतर येथे सैनिकांची संख्या सातत्यानं वाढली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे