नवरात्रीमध्ये हरिनाम कीर्तन करण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

पुणे, १२ ऑक्टोबर २०२०: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र सणामध्ये महाराष्ट्र राज्य वारकरी परिषद ओतूरला दरवर्षीच हरिनाम कीर्तन नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करण्यात येते. १९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर असंच सात दिवसांचा हा कार्यक्रम असून संध्याकाळी ६ ते ९ किर्तन कार्यक्रम आयोजिला जाणार आहे.

पण यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच स्तरांवर कार्यक्रम बंद झालेले आहेत. तरी महाराष्ट्र राज्य वारकरी परिषद औतुर यावर्षी नवरात्रामध्ये शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करत फक्त पन्नास व्यक्तींना किर्तन करण्यासाठी परवानगी द्यावी. अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ यांच्यातर्फे उपजिल्हाधिकारी कटारी मॅडम यांना आज देण्यात आले.

सालोसाल चालत आलेली ही परंपरा यावर्षी खंडित न होऊ देता शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत हरिनाम कीर्तनाचे आयोजन करू असे आश्वासन देत हे निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप लोंढे, पुणे जिल्हा सचिव सुनील तोडकर, पुणे शहर सचिव अनिकेत बांदल, महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नायर मॅडम, वेल्हा तालुक्याचे अध्यक्ष तानाजी लोहकरे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा