पुणे, १२ ऑक्टोबर २०२०: हाथरस येथील दलित महिला कु. मनीषा वाल्मिकी तिच्यावर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर शासन करणेबाबत राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघातर्फे उपजिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी यांच्याकडून हाथरस जिल्ह्यातील खेडे गावात मनीषा वाल्मिकी नावाच्या दलित परिवारातील मुलीवर उच्च जातीतील काही गुंडांनी अमानुष बलात्कार करून तिला शारीरिकरीत्या अत्यंत जखमी करून तिची जीभ कापली. या कृत्याचा राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघातर्फे निषेध करण्यात आला.
या निवेदनाद्वारे सदर गुन्हा योग्य त्या कायद्याच्या कलमाखाली फास्ट ट्रॅक न्यायालयात दाखल करून आरोपींना त्वरित कठोर शिक्षा करण्यात यावी व पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप लोंढे, पुणे जिल्हा सचिव सुनील तोडकर, पुणे शहर सचिव अनिकेत बांदल, महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नायर मॅडम, वेल्हा तालुक्याचे अध्यक्ष तानाजी लोहकरे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे