जॉन्सन अँड जॉन्सन यांनी कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचणीवर आणली तात्पुरती बंदी

वॉशिंग्टन, १३ ऑक्टोंबर २०२०: कोरोना लसीची अपेक्षा असलेल्या लोकांना आणखी एक धक्का बसला आहे. जॉन्सन आणि जॉन्सन’नं कोरोनावरील त्यांची क्लिनिकल चाचणी तात्पुरती थांबविली आहे. कंपनीनं सोमवारी जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, एका अभ्यासात सहभागी झालेल्या एका व्यक्तीला निदान न झालेला आजार झाल्याचं समोर आलं आहे त्यामुळं त्यांनी आपली चाचणी तात्पुरती थांबवली आहे.

जॉन्सन अँड जॉनसन यांनी नमूद केलं की सहभागी डेटाबेस आणि सेफ्टी मॉनिटरींग बोर्ड तसेच कंपनीच्या क्लिनिकल आणि सेफ्टी फिजिशियनद्वारे सहभागीच्या आजाराचं परीक्षण केलं जात आहे. कंपनीनं असं म्हटलं आहे की, अशा मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या चाचण्यांमध्ये ज्यामध्ये एकाचवेळी दहा हजार लोकांवर परीक्षण केलं जातं अशा चाचण्यांमध्ये अनेकदा किरकोळ कारणामुळं काम थांबवावं लागतं.

तूर्तास या लसीच्या चाचण्या थांबवण्यात आल्याचं जॉन्सन अँड जॉनसन यांनी सांगितलं. सध्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेल्या या चाचणीचा वैद्यकीय नियामक मंडळ जे परीक्षणावर स्थगिती आणत असतात त्यांच्याशी काहीही संबंध नाही. ही कंपनीची आंतरिक बाब आहे. हे प्रकरण त्याच प्रकरणाशी मिळतंजुळतं आहे जेव्हा सप्टेंबरमध्ये अ‍ॅस्ट्रॅजेनेका एझेडएन.एल’नं त्यांच्या लसीच्या शेवटच्या टप्प्यातील चाचणी थांबविली. कारण त्यावेळी देखील परीक्षण सुरू असलेल्या एका व्यक्तीवर थोडे विपरीत परिणाम दिसून आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा