आता पँगोंग सरोवराच्या पाण्याखालील गतिविधिंवर चीनचं लक्ष…

लडाख, १३ ऑक्टोबर २०२०: लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात तणाव सुरू झाल्यापासून, चीन सैन्य पँगोंग तलावाच्या भागावर लक्ष ठेवून आहे. चिनी सैन्याच्या पीपल्स लिबरेशन आर्मी ग्राउंड फोर्स (पीएलएजीएफ) हाइस्पीड पेट्रोलिंग क्राफ्ट च्या माध्यमातून पाण्यावर लक्ष ठेवून आहे, ज्यामध्ये टाइप ३०५, टाइप ९२८ डी प्रकारच्या नौका वापरल्या जात आहेत.

परंतु अलीकडील उपग्रह फोटोंवरून असं दिसून आलं आहे की, चीन आता पँगोंग त्सो’ची खोली जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या कामासाठी चीन सध्या अस्तित्वात असलेल्या अद्यायावत प्रणालीचा वापर करत आहे, जी प्रणाली पाणबुडी युद्धांमध्ये बचाव करण्यासाठी वापरली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार चीननं फिंगर ४ ते फिंगर ८ दरम्यान १३ नौका तैनात केल्या आहेत. फिंगर ४ पासून तब्बल अडीच किमी अंतरावर असलेल्या फिंगर ५ जवळ आठ नवीन बोटी वाढविण्यात आल्या.

 

चिनी सैन्याच्या हवाई दलालानं आता पँगोंग त्सो मधील पाण्याखालील हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी एक विशेष प्रकारचे विमान वापरण्यात येत आहे, ज्यामध्ये एक चुंबकीय विसंगती शोधक (एमएडी बूम) स्थापित केलं आहे. यात वाय -८ जीएक्स ६ आणि शांक्सी वाय -८ ट्रान्सपोर्टरच्या गाओक्सिन -६ किंवा हाय न्यू ६ व्हेरियंटसारख्या विमानांचा समावेश आहे, ज्यांचा वापर चीनी नौदलानं पृष्ठभागविरोधी पाणबुडी युद्धासाठी केला आहे.

ही साधनं पाण्याखाली लपलेल्या पाणबुड्या सहज शोधू शकतात परंतु त्याशिवाय ते पाण्यातील खनिजे आणि माती ओळखण्यातही तज्ज्ञ आहेत. आता अशीच विमाने होटान, कोर्ला आणि वडुनमधील उपग्रह प्रतिमेत दिसली आहेत.

 

वॅडून विमानतळावरून समोर आलेल्या नवीन उपग्रहाच्या प्रतिमांमध्ये असं दिसून आलं आहे की २४ ऑगस्टला तेथे वाय -८ जीएक्स ६ तैनात करण्यात आलं होतं. या विमानामध्ये जुन्या आवृत्तीपेक्षा लहान मॅड बुम आहे. सध्या विमान ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेवरून असं समजत आहेत की सध्या ते परीक्षणाच्या काळातून जात आहे. त्याचबरोबर झियान-यानलियन एअरबेसवर अशी आणखी चार विमानं तैनात केली आहेत.

डोकलाम वादापासून चीननं भारत-तिबेट सीमेवर आपली हवाई दलाची क्रिया वाढविली आहे. गेल्या तीन वर्षात या पाळत ठेवण्याची यंत्रणा वाढविण्यात आली आहे. लहासा, हुतान, वुडून, अक्सू यासारख्या भागात तैनात केलेल्या यूएव्हीमार्फत चीन सतत भारतीयांचा मागोवा घेत आहे.

हवामान आणि कम्युनिकेशनच्या पातळीवर काम करणार्‍या विंगलाँग २ यूएव्हीची चाचणी नुकतीच चीननं केली. त्याची चाचणी सर्वप्रथम उक्सॅटल एअरबेस येथे झाली, जेणेकरुन त्याचा वापर भारताविरूद्ध होऊ शकंल. चीन भारतीय नौदलाच्या पी ८ आय पाळत ठेवणाऱ्या विमानाचा मागोवा घेत आहे आणि त्याद्वारे पाण्याखालील हालचालींवर नजर ठेवून आहे. अशा परिस्थितीत भारताला अद्याप चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवावन लागंल.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा