ट्रम्प यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह, निवडणुकीच्या प्रचारासाठी सज्ज

वॉशिंग्टन, १३ ऑक्टोंबर २०२०: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. त्यांची कोरोना चाचणी नकारात्मक असल्याची खात्री व्हाईट हाऊस फिजिशियन’नं पटवून दिली आहे. कोरोना संक्रमणापासून बरे झाल्यानं ट्रम्प यांनी निवडणूक प्रचार पुन्हा सुरू केला आहे. ट्रम्प यांनी सोमवारपासून फ्लोरिडामध्ये आपली निवडणूक सभा सुरू केली आहे.

ट्रम्प यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्याची माहिती व्हाईट हाऊस फिजीशियन सीन कॉनली यांनी दिली, ते म्हणाले की डोनाल्ड ट्रम्प आता पूर्णपणे स्वस्थ आहेत आणि त्यांना संसर्गाचा धोका नाही. सीन यांनी पत्रकार सचिव कायल मॅकेन्नी यांना लेखी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना ची लागण झाल्यावर निवडणूक प्रचारावर परिणाम झाला. आता चाचणी अहवाल नकारात्मक येताच ट्रम्प यांनी निवडणूक मोहीम सुरू केली आहे.

पुन्हा विजयी होईल: ट्रम्प

या रॅलीला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की ते आता पूर्णपणे स्वस्थ आहेत व पूर्ण जोमानं तयार आहेत. ट्रम्प यांनी आपल्या सभेत सांगितलं की पुन्हा एकदा ते निवडणूक जिंकतील आणि आपल्या मेक अमेरिका ग्रेट अगेन मोहिमेवर पुन्हा रुजू होतील. ३ नोव्हेंबरला अमेरिकेत मतदान होणार आहे त्यात पार्श्वभूमीवर हा शेवटचा कॅम्पेन सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा