काळ आला होता पण वेळ नव्हती…..

4

इंदापूर, १५ ऑक्टोबर २०२० : पावसाच्या पाण्यात गाडीसोबत वाहत जाणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी जीवनदान दिले.

संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसत होता बुधवारी रात्री पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर नजीक सेवा रस्ता पूर्णतः पाण्यात गेला होता. परंतु कामावरून घरी जाणाऱ्यांना घराची ओढ काही थांबू देत नव्हती त्या रस्त्यावरून पाण्याचा अंदाज घेत काही प्रवासी आपली गाडी तसेच रेटत होते परंतु पाण्याचा जोर अधिक असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर गाडी पाण्यासोबत वाहत चालली होती. याच दरम्यान महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी महामार्गावर रात्र गस्तीसाठी येत असताना त्यांनी हा सर्वसाधारण डोळ्यांनी पाहिला आणि मग सुरू झाला बचाव कार्याचा थरार.

स्थानिक ग्रामस्थ आणि पुणे सोलापूर हायवे गस्त पथक महाराष्ट्र सुरक्षा बल चे जवान गौरव घोडे व विनोद पवार व पोलीस यांनी सदर व्यक्तींना शर्थीचे प्रयत्न करत पाण्यामधून बाहेर काढले . महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान यांनी याबाबतची सर्व माहिती वरिष्ठ अधिकारी संदीप धोत्रे व नवनाथ फराटे व कृष्णा पालवे यांनी सादर केली.
वेळीच सुरक्षा बलाच्या जवानांनी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढल्याने प्रवाशांनी आपला जीव भांड्यात पडल्यासारखे झाले असे मत व्यक्त करून सुरक्षा बलाच्या जवानांचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा