गटई कामगारांना शासनाने ५००० रुपये अनुदान द्यावे – माजी मंत्री बबनराव घोलप

इंदापूर, १७ ऑक्टोबर २०२० : गेली ६ महिने कोरोना रोगाच्या महामारीमुळे चर्मकार समाजातील गटई कामगार हा रोजगार नसल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कर्नाटक राज्याप्रमाणे प्रत्येक गटई कामागारास शासनातर्फे रू.५०००/ अनुदान देण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
त्याचप्रमाणे चर्मकार समाजाच्या इतर मागण्या गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने त्याचा प्राधान्याने विचार व्हावा असेही या निवेदनामध्ये नमूद केले आहे.

१) कोरोना रोगाच्या महामारीमुळे चर्मकार समाजातील प्रत्येक गटई कामागारास
शासनातर्फे रू.५०००/- अनुदान देण्यात यावे.

२) संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे (लिडकॉम) मधील थकीत कर्जदारांची कर्जमाफी देण्यात यावी.

३) मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केल्याप्रमाणे प्रत्येक महसूल विभागीय स्तरावर संत रविदास भवन उभारण्यात येऊन त्याकरीता शासकिय जागा व अनुदान उपलब्ध
करून देण्यात यावे.

४) राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोगास कायदेशीर दर्जा देऊन, पंजाब, हरियाणा
व कर्नाटकाच्या धर्तीवर कायदा करण्यात यावा.

५) राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोगावर अध्यक्ष/सदस्य नेमतांना चर्मकार समाजास पुरेसे प्राधान्याने प्रतिनिधीत्व देण्यात यावे.

६) केंद्र शासनाने संत रविदास जयंतीनिमित्त ऐच्छिक सुट्टी जाहीर केली आहे त्याप्रमाणे राज्यात संत रविदास जयंतीनिमित्त शासकिय सुट्टी जाहीर करण्यात यावी.

७) संत रविदासांचा धडा शासकिय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला होता परंतू तो नंतरच्या सरकारने काढून टाकला तो पुन्हा शालेय अभ्यासक्रमात घेण्यात यावा
व संत रविदासांचे निर्भीड व विज्ञानवादी साहित्य सर्वांना अभ्यासासाठी वेगवेगळ्या वर्गात पाठ्यपुस्तकांद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे.

८) मुंबईमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघासाठी चर्मकार बंधूंच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने चेंबूर व बोरीवली येथे दोन कार्यालये उपलब्ध करून दिली होती परंतू ती पुन्हा काढून घेण्यात आल्याने परत मुंबई व उपनगरात समाजबांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावी.

न्यूज अनकट प्रतिनिधी निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा