इंदापूर,१८ ऑक्टोबर २०२०: इंदापूर तालुक्यातील सणसर येथील दि. १४ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या व विस्थापित झालेल्या 200 कुटुंबातील 700 लोकांना 4 दिवस भोजनाची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडून आज पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन्न छत्र सुरू करण्यात आले आहे.
पुरामध्ये या नागरिकांचे संसार उघड्यावर पडल्याने त्यांची भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी प्रदीप गारटकर यांच्या विचाराने हे अन्नछत्र सुरू होत आहे. त्यामुळे नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची आता कसलीही चिंता राहणार नाही. यासाठी लागणारे साहित्य इंदापूर येथून गाडी घेऊन गेली आहे.
या गाडीमध्ये किराणा माल, भाजी मंडई व इतर साहित्य तात्काळ पाठवण्यात आले आहे. याप्रसंगी तालुक्याचे कार्याध्यक्ष अतुल झगडे शहराध्यक्ष अनिल राऊत, उन्हाळे सर , शेलवणे सर, विकास पलंगे, कुंभार हे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे













































