उस्मानाबाद, २२ ऑक्टोबर २०२०:मागील दिवसांत झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीची पाहणी करून, योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न हा सर्वोतोपरी चालूच आहे. तरी, शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी, अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करत असल्याचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता काल दिनांक २१ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते. तरी, या संकटकाळात शेतकरी बांधवाना बाहेर काढण्यासाठी शासन पुर्ण प्रयत्न करेल असे बोलून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यांनी घेतलेल्या बैठकीत आ. राणा जगजीतसिंह पाटील यांनी काही महत्त्वाचे मुद्दे समोर मांडून ते मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले; असे म्हणून आता शेतकरी बांधवांनी चिंता करू नये आपण यावर नक्की मार्ग काढू असे आश्वासन आज दिनांक २२ ऑक्टोबर रोजी तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) पिंपळा येथील अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना दिले.
यावेळी, जि. प.अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, श्री. संतोष बोबडे, श्री. राजकुमार पाटील, श्री. विक्रमसिंह देशमुख, श्री. यशवंत लोंढे, गावातील प्रमुख कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड