बारामती, २४ ऑक्टोबर २०२० : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि. २०) झालेल्या लिलावात सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला. प्रतिक्विंटल ४०८१ रुपये दर मिळाला,तसेच या वेळी ८०० क्विंटल आवक झाली. किमान दर प्रतिक्विंटल ३७०१ व सरासरी दर ४ हजार रुपये निघाला.याबाबत सभापती अनिल खलाटे यांनी माहिती दिली.
बारामतीसह फलटण, दौंड,इंदापूर, परंदर, दहीवडी, नातेपुते, अकलूज या भागातून येथे आवक होत आहे. समितीतील वडूजकर आणि कंपनी यांच्या आडतीवर अक्षय पांडुरंग कुंभार या शेतक-याच्या सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला. या वेळी संभाजी किर्वे, नीलेश भिंगे, अमोल वाडीकर यांनी सोयाबीन खरेदी केले.
बारामतीत दर मंगळवारी व शुक्रवारी तेलबियांचा लिलाव होतो. वजन पूर्वीच होत असल्याने लिलाव झाल्यानंतर शेतक-यांना त्याच दिवशी पट्टी दिली जाते. अचूक वजनमाप, चोख व्यवहार, व विश्वासार्हता यामुळे समितीत मोठी आवक होते. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शेतक-यांनी पीक पद्धतीत बदल करून लागवडीचे नियोजन करण्याची सुचना देण्यात आली आहे.शेतात उत्पादित माल स्वच्छ, वाळवून, ग्रेडींग करून विक्रीस आणावा, त्यामुळे चांगला दर मिळेल व
शेतक-यांचा आर्थिक फायदा होईल, अशी माहिती समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
न्युज अन कट प्रतिनिधी – अमोल यादव