मुंबई वाहतूक पोलिसाला मारहाण प्रकरणी महिलेला अटक

11

मुंबई,२५ ऑक्टोंबर २०२०: एका ट्रॅफिक पोलिसाला महिलेकडून मारहाण झाल्याचा दक्खडायक प्रकार समोर आला आहे. सादविका तिवारी असं या महिलेचं नाव आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं महिलेवर कारवाई करताना त्या महिलेनं वाहतूक पोलिसावर हात उचलला. वाहतूक पोलसाने अपशब्द वापरल्याचा दावा या महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे.

सादविका तिवारी नावाची ही महिला मोहसीन खानसोबत विनाहेल्मेट बाईकवर जात होते. हे पाहता कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना दंड भरण्यास सांगितले. पण आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. तिने कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदारांना मारहाण केली. या प्रकरणी सादविका आणि मोहसीनला अटक केली.

पोलिसाने महिलेला शिवी दिल्याचा आरोप होत आहे. या आरोपाचीही चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितले. पोलिसाची कॉलर सोडावी अशी विनंती महिला पोलीस करत असतानाही आरोपी महिला तिचं ऐकत नव्हती. कायदा हातात घेणाऱ्या या महिलेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे