दिल्ली: गांधी कुटुंबामधील सदस्यांची या आधी इतिहासामध्ये हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गांधी परिवाराला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ची सुरक्षा देण्यात आली होती. गांधी कुटुंबासोबत होत असलेल्या घातपाताच्या आधारावर ही सुरक्षा आत्तापर्यंत गांधी परिवाराला सरकार कडून लागू होती, परंतु सरकारने आता निर्णय घेतला आहे की गांधी परिवाराला देण्यात येणारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ची सुरक्षा काढून घ्यावी.
ही सुरक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना लागू होती. ही सुरक्षा काढून घेतल्यानंतर गांधी परिवाराला केवळ झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. ही माहिती गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. काँग्रेसने सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.