कमी स्पीड व वारंवार सर्वर डाऊनला कंटाळून डीएससी जमा करत तलाठ्यांनी पुकारला असहकार

पुरंदर, २६ ऑक्टोबर २०२०: संगणक प्रणालीत कामकाज करत असताना कमी स्पीडमुळे व सततच्या सर्वर डाऊनमुळे डीएससी तहसील कचेरीत जमा करत आॅनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. आज तहसीलदार यांना याबाबत निवेदन देऊन पुरंदरमधील तलाठ्यांनी असहकार आंदोलनास सुरवात केली आहे.

इंटरनेटचे कमी स्पीड सततच्या सर्वर डाऊनमुळे तलठ्यांना वारंवार संगणकीय कामकाजात अडथळे येतात व शेतकऱ्यांची अडचण होत असते. त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून आज सोमवार दि. १६ रोजी पुरंदर तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष राजाराम भामे यांच्या नेतृत्वाखाली सर्व तलाठ्यांनी डीएससी जमा करत तहसीलदारांना निवेदन दिले. वेगवेगळ्या कारणांसाठी शेतकऱ्यांना सातबारा व आठ अ उतारे सतत लागतात. उतारे संगणकीय प्रणालीतून वेळत उपलब्ध होत नाहीत. दिवस दिवस शेतकरी कार्यालयात बसुन असतात, रात्रीच्या वेळी कधीतरी सर्व्हरला स्पीड येतो त्यावेळेत उतारे, दाखले काढले जातात. मात्रा आता रात्रीही सर्व्हर डाऊन असतो. अतिवृष्टीचे पंचनामे व इतर कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. शेतकरी आधीच मेटाकुटीला आले होते. आता सातबारा वेळेत मिळत नसल्याने त्यांचा रोष तलाठी, मंडलाधीकारी यांना सहन करावा लागतो. वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयांना कल्पना देउनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आज आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी पुरंदर तलाठी संघाचे अध्यक्ष राजाराम भामे, सचिव सुधीर गिरमे, गणपत खोत, निलेश पाटील, साईनाथ गवळी, सोमशंकर बनसोडे, निलेश अवसरमोल, प्रमोद झुरंगे, रूपाल शेळके, नीलम कांबळे, नीलम देशमुख, सुनिता वनवे, स्नेहा कांबळे, सुनिता वनवे, मनीषा भोंगळे, आदींसह बहुतांश तलाठी उपस्थित होते. या अशी माहिती बापूसाहेब देवकर यांनी दिली.

याबाबत बोलताना तलाठी संघाचे अध्यक्ष राजाराम भामे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सातबारा व आठ अ मिळण्यासाठी असलेल्या संगणक प्रणालीत वारंवार बिघाड होत असतो. पर्यायाने शेतकऱ्यांच्या रोषाला तलाठ्यांना सामोरे जावे लागत आहे. कमी सर्व्हर स्पीडमुळे डिजीटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी) पुरंदरच्या तहसीलमध्ये जमा करुन असहकार आंदोलन करण्यात येते आहे. यापुढे सर्व्हरचे स्पिड वाढले की तात्काळ काम सुरु करु, शेतकऱ्यांच्या गैरसोय बद्दल दिलगिर आहोत.

न्युज अनकट प्रतीनिधी :- राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा