उजनी धरणातून भीमा नदीद्वारे ८७ टीएमसी पाणी गेले

माढा, २७ ऑक्टोबर २०२०: गेली पंधरा दिवस झाले उजनीतून भीमानदीला रात्रंदिवस पाण्याचा विसर्ग सुरू होता. तो मंगळवारी सकाळी दहा वाजता बंद करण्यात आला १४ ऑक्टोबर पासून सोडण्यात आलेले ५६ टीएमसी पाणीसाठा पंधरा दिवसात उजनीतून भीमा नदीला  सोडण्यात आला.

१४ आक्टोबरच्या अगोदर चालू हंगामात ३१ टीएमसी पाणी उजनीतून सोडण्यात आले होते. एकंदर ८७ टीएमसी पाणीसाठा भीमेत चालू हंगामात सोडले गेले. राज्यात झालेल्या अतिवृष्टीने सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीला आलेला महापूर व नीरा नदीच्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कधी नव्हती ती पूरस्थिती निर्माण झाली होती. १६ ऑक्टोबर पासून ते २७ सप्टेंबर पर्यंत ३० हजाराने विसर्ग सुरू होता. परंतु परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या विसर्गात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीला सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे.

उजनीची सद्यस्थिती:

एकूण पाणी पातळी ४९७.०८५ मीटर

एकूण पाणी साठा ३४०६.४७ दलघमी
(टीएमसी १२०.२८)

उपयुक्त पाणी साठा १६०३.६६ दलघमी
(टीएमसी ५६.६३ )

टक्केवारी १०६ %

दौंडमधून येणारा विसर्ग
८९९० क्यूसेक

कालवा बंद
भीमा नदी बंद
बोगदा २००
वीजनिर्मिती १६००

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा