बीआरटी सुरू करा अन्यथा आंदोलन !

26

पुणे, २८ ऑक्टोबर २०२०: सातारा रस्त्यावरील बीआरटी प्रकल्पासाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनसुद्धा अद्याप बीआरटी सुरू झाली नाही. या मार्गावर बीआरटी सुरू करता येत नसेल, तर हा मार्ग सामान्य पुणेकरांसाठी खुला करावा, अन्यथा आम्ही रत्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी २१२ पर्वती विधानसभा मतदारसंघ विभागाकडून आज देण्यात आला.

डॉ. श्री. राजेंद्र जगताप( CMD PMPL Pune ) व मा. श्री. कुणाल खेमनार( Additional Commissioner PMC Pune ) यांना या बाबत निवेदन देण्यात आले. स्वारगेट ते कात्रज यादरम्यान च्या बीआरटी मार्गासाठी २०१७ ते २०२० या काळात सुमारे १०८कोटी खर्च झाला आहे. या मार्गावर प्रयोग झाले, मात्रा बीआरटी सुरू होऊ शकली नाही. प्रशासनाने एका बसस्टोपवर ८० लाख रुपये याप्रमाणे खर्च केला. मात्र, गेली कही वर्ष बस स्टॉप तयार झालेला नाही, ना बीआरटी मार्ग सुरू झाला.

या मार्गावर बीआरटी धावणार नसेल, तर रस्ता सामान्य नागरिकांसाठी खुला करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा निवेदनातून दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पर्वती विधानसभाचे नगरसेविका सौ. अश्विनी ताई नितीन कदम (मा. स्थायी समिती अध्यक्ष, पुणे) यांच्या नेृत्त्वाखाली देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी महिला पर्वती विधानसभा अध्यक्ष सौ. श्वेता संग्राम होनराव कामठे, महिला पदाधिकारी सौ. रुपाली जाधव कदम, पर्वती युवक अध्यक्ष अमोल ननावरे, सुशांत ढमढेरे, तुषार नांदे , प्रभाग अध्यक्ष अभिजित उंद्रे, प्रशांत कदम, संग्राम होनराव, संग्राम वाडकर सचिन, प्रशांत कदम, सचिन जमदाडे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे