लोणी काळभोर: दि. ०१ नोव्हेंबर २०२० शिवाजीनगर न्यायालय शेवाळवाडी ते लोणी काळभोर पर्यंत मेट्रो मार्गाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम अखेर दिल्ली मेट्रोकडून सुरू करण्यात आले आहे. मध्यंतरी कोविड- १९ मुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे काम खरडले होते. त्यामुळे लवकरच या मेट्रो मार्गाचे सर्व्हेक्षण अहवाल प्राप्त होईल, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.
पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान शिवाजीनगर पासून ही मेट्रो हडपसर येथे नेण्याची मागणी होत होती. त्यामुळे हिंजवडी -शिवाजीनगर- हडपसर -फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी “शिवाजीनगर ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डन पर्यंत दर्शविण्यात आलेला मेट्रो मार्ग लोणीकाळभोरपर्यंत वाढविण्यात यावा. दिल्ली मेट्रोने फुरसुंगीपर्यंतच्या सादर केलेल्या अहवाल सुधारीत करून तो तातडीने सादर करावा,’ अशा सूचना पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. परंतु, कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला.
राज्य सरकारने जूनपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात सुरूवात केली. गेले दोन ते तीन महिने शहरातील व्यवहार व वाहतूक टप्याटप्प्याने सुरळीत सुरूळीत झाली. या नवीन मार्गाचे सर्व्हेक्षणात ट्रॉफिक सर्व्हे महत्वाचा भाग आहे. परंतु मार्गावर फारशी वाहतूक नसल्यामुळे हे काम थांबले आहे. परंतु आता वाहतुक सुरळीत झाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या सर्व्हेक्षणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली असल्याचे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शिवाजीनगर न्यायालयात ते फुरसुंगी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे सर्व्हेक्षणाचे काम पीएमआरडीने दिल्ली मेट्रोला दिले होते. दिल्ली मेट्रोने या मार्गाचे सर्व्हेक्षण करून मध्यंतरी प्राधिकरणाकडे यासंदर्भातील अहवाल दिला आहे. त्यामध्ये १५.५३ किलोमीटर लांबीचा हा मार्ग दर्शविण्यात आला आहे. परंतु तो पुन्हा लोणीकाळभोरपर्यत पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे त्यामुळे हा मार्ग आता वीस किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचा मार्ग होणार आहे. या संपूर्ण मार्गावरून ५७ मेट्रोच्या कार धावण्याचे नियोजन असणार आहे.
शिवाजीनगर कोर्ट, रेल्वे कॉलनी, कलेक्टर ऑफिस, एमजी रोड, फॅशन स्ट्रीट, मंमादेवी चौक, रेसकोर्स, काळूबाई चौक, वैदवाडी, हडपसर फाटा, हडपसर बस डेपो, ग्लाईडींग सेंटर, फुरसुंगी आयटी पार्क, सुलभ गार्डन असा मार्ग होता. तो आता सुलभ गार्डन येथून लोणीकाळभोरपर्यंत नेण्यात येणार असून त्या मार्गाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
”कोविड-१९ मुळे या या मार्गाचे सर्व्हेक्षणाचे काम थांबले होते. दिल्ली मेट्रोकडून ते आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पुढील महिन्यांपर्यंत दिल्ली मेट्रोकडून या संदर्भातील अहवाल पीएमआरडीएकडे सादर होईल.”
– सुहास दिवसे आयुक्त पीएमआरडीए यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे