प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केजरीवाल यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर २०२०: दिल्लीतील वाढतं प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. जगातील सर्वात दूषित शहरांपैकी दिल्लीची ओळख आहे. खास करून हिवाळ्यामध्ये हवेतील प्रदूषणाचा मोठा दुष्परिणाम दिल्लीतील वातावरणात दिसून येतो. कारण, रस्त्यावरील दृश्यमानता नेहमीच्या प्रमाणात खूप कमी झालेली असते. इतकच काय तर वर्षभर होत असलेल्या प्रदूषणामुळं आरोग्याच्या देखील मोठ्या समस्या दिल्ली समोर उभ्या आहेत. हे सर्व पाहता आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशाच्या राजधानीत यापुढं कोणतीही नवी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री सुरु करण्यास परवानगी मिळणार नाही.

केजरीवाल यांनी अशा नव्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री सुरु करण्यावर बंदी घातली आहे. असं असलं तरी दिल्लीत नव्यानं तयार होणाऱ्या औद्योगिक भागात केवळ कमी प्रदुषण करणाऱ्या सर्व्हिस इंडस्ट्री आणि हायटेक इंडस्ट्री सुरु करण्यास परवानगी असणार आहे. यापुढील काळात दिल्लीमध्ये माहिती तंत्रज्ञान, माध्यमं, कॉल सेंटर, एच आर सर्व्हिस, बीपीओ, टीव्ही व्हिडीओ प्रोडक्शन, वकील, सीए, आर्किटेक्ट, मार्केट रिसर्च, प्लेसमेन्ट एजन्सी इत्यादी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी असंल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल (२ ऑक्टोबर) डिजीटल पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

अरविंद केजरीवाल म्हणाले, “केंद्र सरकारने दिल्लीसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी दिल्ली सरकारने केंद्र सरकारला एक प्रस्ताव पाठवला होता. यामुळे दिल्लीतील औद्योगिक क्षेत्रांचा चेहरामोहराच बदलणार आहे. सध्या दिल्लीत अनेक बांधकाम आणि संबंधित उद्योग सुरु आहेत. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण वाढत आहे. मात्र, आता दिल्लीतील कोणत्याही नव्या औद्योगिक क्षेत्रात हायटेक आणि सर्व्हिस इंडस्ट्रीलाच परवानगी दिली जाईल.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा