नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर २०२० : फ्रान्सकडून भारताला राफेल लढाऊ विमानांची दुसरी खेप आज बुधवारी प्राप्त होणार आहे. ही विमाने भारताकडे रवाना करण्यात आली असून अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर उतरणार आहे.
काल मंगळवारी या विमानांनी भारताकडे झेप घेतली असून कुठेही न थांबता ती भारतात पोहोचणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या विमानांसोबत हवेत इंधन भरणारी विमाने ही राहणार आहेत.
या तीन विमानांच्या आगमनानंतर भारतीय हवाई दलाकडे राफेल लढाऊ विमानांची संख्या ही आठ होणार आहे. भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानांच्या खरेदीचा करार केला असून हा संपूर्ण व्यवहार ५९ हजार कोटी रूपयांचा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी