आंदोलन करणं हा भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम: संजय राऊत

मुंबई, ५ नोव्हेंबर २०२०: रिपब्लिक टीव्ही चे पत्रकार तसेच संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, त्यांच्या अटकेनंतर भाजपकडून राज्य सरकारवर तसेच मुंबई पोलिसांवर टीका करण्यास सुरुवात झाली. राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केवळ सूडापोटी अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे असं भाजपचं म्हणणं आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी असं म्हटलं आहे की, भाजपच्या नेत्यांनी अन्वय नाईक कुटुंबाची भेट घ्यायला हवी. त्यांच्या वेदना समजून घ्यायला हव्यात.

अर्णब गोस्वामी आणि भाजप नेत्यांवर टीका करत संजय राऊत म्हणाले की, आंदोलन करणे हा भाजपचा अधिकार आहे. तो त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असू शकतो. पण त्यांनी नाईक कुटुंबाला भेटून त्यांच्या भावना समजून घ्याव्या. अर्णब गोस्वामी हे भाजपाचे कार्यकर्ते आहे. त्यांचे चॅनल हे पक्षाचे लाऊडस्पीकर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी सर्व भाजप नेते मैदानात उतरले आहे. गोस्वामींवर केलेली कारवाई पत्रकार म्हणून नाही.

पुढं ते म्हणाले की, रिया चक्रवर्तीच्याबाबतीत भाजपची वेगळी भूमिका असते आणि अन्वय नाईक यांच्याबाबतीत वेगळी असते. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात नोट नव्हती तरी प्रकरण पुढपर्यंत नेलं. याप्रकरणात सुसाईड नोट असून त्यात नावं देखील आहेत. महाराष्ट्राचे पोलीस हे बाहुल्या नाहीत. अन्वय नाईक यांच्या घरी जाऊन जर भाजपवाल्यांनी त्यांना काय वाटतं ते समजून घ्यायला हवं. आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना आहे. या देशात मानवता, सत्य, न्याय या शब्दाचा वापर कधी करु नये.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा