आज पासून व्हॉट्सअ‍ॅप द्वारे देखील पैसे ट्रान्सफर करता येणार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर २०२०: व्हॉट्सअ‍ॅप यूपीआय पेमेंट या ॲपचा वापर करून आता वापर करते व्हाट्सअपच्या माध्यमातून पैसे एकमेकांना ट्रान्सफर करू शकतील. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’नं गुरुवारी व्हॉट्सअ‍ॅप ला याबाबत मान्यता दिली आहे. जवळपास ३ वर्षापासून व्हॉट्सअ‍ॅप या संधीची वाट पाहत होतं आणि गुरुवारपासून आता कंपनीनं हे सर्वत्र लागू केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप यूपीआय आधारित पेमेंटची चाचणी यापूर्वीच केली गेली आहे.

फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी म्हटलं आहे की, ‘भारतात व्हॉट्सअ‍ॅपवर पेमेंट्स थेट केले गेले आहेत आणि लोक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवू शकतील. आम्ही उत्सुक आहोत की कंपनी भारताच्या डिजिटल पेमेंट शिफ्टमध्ये योगदान देऊ शकंल ‘

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट भारतातील दहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असंल. आपल्या व्हॉट्सअॅप अॅपवर आधीपासून पेमेंट पर्याय असल्यास, आता आपण ते वापरू शकता. तसं नसंल तर व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून तुम्ही पेमेंट पर्याय तपासू शकता. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट वापरण्यासाठी ग्राहकांकडं डेबिट कार्ड असलं पाहिजे जे यूपीआयला सपोर्ट करतं. आपण व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट पर्यायावर जाऊन बँक निवडून आणि तपशील प्रविष्ट करुन हे सक्रिय करू शकता.

व्हॉट्सअॅप’नं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘आजपासून देशातील व्हॉट्सअॅप वापरकर्ते या अ‍ॅपद्वारे पैसे भरण्यास सक्षम असतील. व्हॉट्सअ‍ॅपचा सुरक्षित पेमेंटचा अनुभव संदेश पाठविण्याइतकं पैसे पाठविणं सुलभ करंल ‘

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचे व्हॉट्सअ‍ॅप भारतासमवेत युनिफाइड पेमेंट सिस्टम अर्थात यूपीआय आधारित पेमेंट इंटरफेस तयार केला गेला आहे आणि डेटा लोकलायझेशन देखील विचारात घेतले गेले आहे. पेमेंट सेवेसाठी व्हॉट्सअॅप’नं पाच मोठ्या बँकांशी करार केला आहे. यात आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय आणि जिओ पेमेंट्स बँक यांचा समावेश आहे.

हे लक्षात घेण्यासारखं आहे की, व्हॉट्सअ‍ॅपवरून केवळ व्हाट्सअप मध्येच पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात असं नसून यूपीआय समर्थित कोणत्याही अॅपवर पैसे पाठविले जाऊ शकत नाहीत. म्हणजेच समोरील व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट वापरत नसली तरीही आपण व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे देण्यास सक्षम असाल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा