पुणे , ७ नोव्हेंबर २०२० :कमला नेहरू हॉस्पिटल येथे झालेल्या दोन वर्षी मुलीच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघातर्फे निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदन हे आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका आशिष भारती, कमला नेहरू हॉस्पिटल प्रमुख अधीक्षक त्रंबके मॅडम यांना दिले आहे.
महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू रुग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. आरोग्य सुरक्षा आणि हक्काची वैद्यकीय सुविधा म्हणून महानगरपालिकेच्या सुविधांवर अवलंबून राहणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्यांच्या विश्वासाला तडा गेला आणि उपचारासाठी आलेल्या दोन वर्षी मुलीचा झालेला मृत्यू संशयास्पद असून या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघातर्फे देण्यात आलेले आहे.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मासंदीप लोंढे, महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. सुनील तोडकर , पुणे शहर सचिव मा.अनिकेत बांदल तालुका अध्यक्ष मा. तानाजी लोहकरे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे