पुरंदर, १२ नोव्हेंबर २०२०: कोरोनामुळे लॉकडाऊनच्या परिस्थीतीत व्यावसायीकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकतेच राज्य शासनाने सर्व निर्बंध शिथील केले. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोक खरेदीसाठी बाजारपेठेत येऊ लागले आहेत. दिवाळी निमित्त रोषणाईसाठी लोक पारंपारिक पणत्या, आकाश कंदील, लक्ष्मी पुजनासाठी केरसुणी, बच्चे कंपनीसाठी किल्यावर ठेवायचे सैनिक व इतर वस्तुंच्या खरेदीसाठी नीरा बाजारपेठेत लोकांची लगबग सुरु झाली आहे.
दीपावली निमित्त लोक आपल्या घरामध्ये दिव्यांची आरास करित असतात. बाजारामध्ये अनेक प्रकारच्या पणत्या विक्रीस आलेल्या आहेत. नीरेमध्ये मोठ्या प्रमाणावर पणत्या विक्रीस आल्या आहेत. लोकही मोठ्या प्रमाणात त्याची खरेदी करतायत. मात्र यामध्ये लोकांचा कल हा प्लॅस्टिकच्या चायनीज पणत्या खरेदीकडे दिसून येतोय. त्यामूळे लोकांनी आपल्या देशातील कुंभार समाजाने बनवलेल्या पणत्या खरेदी कराव्यात असा आवाहन या लोकांकडून करण्यात येत आहे.
केरसुणी अर्थात लक्ष्मीच्या व्यवसायावर कोरोनचा परिणाम कमी किमतीत विकावी लागते ही लक्ष्मी
दिपावलीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी राज्यात पारंपरिक केरसुणीला पुजेचा मान असतो. तीची लक्ष्मी म्हणून पुजा केली जाते आता घरात स्वच्छतेसाठी वेगवेगळे झाडू वापरले जातात. मात्र लक्ष्मी पूजनासाठी मात्र पारंपरिक केरसूनीचाच वापर केला जातो. त्यामूळे दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात केरसुणीची विक्री होत असते. यातून या केरसुणी बणावनाऱ्यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळत असते. मात्र यावर्षी लोकांनी कोरोनामुळे कमी किमतीतील केरसुणी खरेदी करण्यावर भर दिला आहे. चाळीस रुपये खर्च असणारी ही लक्ष्मी आता ४० ते ५० रुपयांनी विकली जात आहे. त्यामूळे या व्यावसायिकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
किल्ले व सैनिकांनी सजली नीरेची बाजार पेठ सैनिक व किल्ले खरेदीसाठी लोक करतायत गर्दी
महाराष्ट्रात दीपावली म्हटलं की, लहान मुलांपासून तरुणांना पर्यंत जिव्हाळ्याचा विषय येतो तो म्हणजे किल्ले बनवणे. राज्यत प्रत्येकाच्या घरासमोर एक छोटासा किल्ला बांधलेला पहायला मिळतो. या किल्ल्यांच्या सजावटीसाठी छ्त्रपती शिवाजी महाराज सैनिक तसेच इतर मातीच्या मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात असते. नीरा येथील मुख्य बाजारपेठ या मातीच्या मूर्तींची गजबजून गेली आहे. छोट्या मूर्ती बरोबरच आता रेडिमेड किल्लेही मोठ्या प्रमाणात विक्रीस आले आहेत. त्यांनाही मोठी मागणी आहे. कोरोनाचे नियम पाळून हे विक्रेते व्यवसाय करतायत. तालुका प्रशासनाने व्यावसायास परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभारही माणन्यात आले.
न्युज अनकट प्रतिनिधी :- राहुल शिंदे