नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर २०२०: गेल्या २४ तासांत भारतात ३० हजारांहून अधिक नवीन संसर्ग होण्याची नोंद झाली असून या कालावधीत मृत्यूची संख्या ४३५ आहे. यासह आतापर्यंत भारतात एकूण संक्रमित होण्याचं प्रमाण ८८ लाख ४५ हजार १२७ पर्यंत पोहोचलं आहे. त्याचबरोबर देशात कोविड -१९ मुळं एकूण १ लाख ३० हजार ७० लोकांचा मृत्यू झालाय. ह्या महामारी मुळं जगात होणाऱ्या एकूण मृत्यूमध्ये भारतात होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण ५.२१ टक्के एवढं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोविड -१९ संसर्गाची एकूण सक्रिय प्रकरणं ४ लाख ६५ हजार ४७८ आहेत. गेल्या २४ तासात या संसर्गामुळं निरोगी झालेल्या लोकांची संख्या ४३ हजार ८५१ आहे आणि त्यासह आतापर्यंत येथे निरोगी लोकांची संख्या ८२ लाख ४९ हजार ५७९ आहे.
मृत्यूच्या आकडेवारीच्या बाबतीत जगातील देशांच्या यादीत भारत तिसर्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आला आहे. गेल्या ७ दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास देशात एकूण ३६२६ मृत्यू होते. गेल्या महिन्यात दिल्ली आणि बिहार या दोन राज्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळं होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात मूर्तीचं प्रमाण कमी झालं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे