माजी निवडणूक आयुक्त टी. एन.शेषन यांचे निधन

25

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे देशाचे माजी निवडणूक आयुक्त टी. एन. उर्फ तिरुनेलाई नारायण अय्यर शेषन (वय ८७) यांचे चेन्नई येथे निधन झाले.
१९३२ साली केरळच्या पल्लकड जिल्ह्यात जन्मलेले शेषन १२ डिसेंबर १९९० ते ११डिसेंबर१९९६ या काळात ते निवडणूक आयुक्त होते. भारतीय निवडणूक प्रक्रियेत त्यांनी आमूलाग्र बदल केले. शेषन यांनी ओळ्खपत्राची सुरुवात केली. १९९६ मध्ये त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
निवडणूक आयोगामध्ये बदल घडवण्यात शेषन यांचा महत्वाचा वाटा आहे.