भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे- हर्षवर्धन पाटिल

इंदापूर दि.२१ नोव्हेंबर २०२० : पुणे विभाग शिक्षक व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक १ डिसेंबर २०२० रोजी होत असून आज दि.२१ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार जितेंद्र दत्तात्रय पवार व पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ वाई येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यास सांगितले.

माजी आमदार व किसनवीर सहकारी साखर कारखाना चेअरमन मदनदादा भोसले, शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य ॲड. जगदीश पाटणे, भाजपा वाई तालुका अध्यक्ष रोहिदास बापू पिसाळ, किसनवीर कारखाना संचालक मधुकर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल शिंदे, संतोष जमदाडे, मीनलबेन मेहता कॉलेज, पाचगणी कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. प्रशांत सुतार सर, नगरसेवक महेंद्र धनवे, नगरसेविका वासंती ढेकाणे, भाजपा माजी शहराध्यक्ष अजित वनारसे, शहर सरचिटणीस विजय ढेकाणे, भाजपा वाई तालुका उपाध्यक्ष सागर घाडगे, सामाजिक कार्यकर्ते विपुल पाटणे यावेळी उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना सूक्ष्म नियोजन करून तसेच मतदारांना मतदान प्रक्रिया योग्य समजावून देणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले. निष्क्रिय सरकारच्या एक वर्षाच्या कालावधीनंतरची ही निवडणूक असल्याने आपण आपल्या मतदानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला योग्य संदेश द्यावा.

पदवीधर व शिक्षक निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला तालुक्यातून मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही मदनदादा भोसले यांनी यावेळी दिली.शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य ॲड. जगदीश पाटणे यांनी वाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पदवीधर सभासद नोंदणी केल्याचे सांगितले .

न्यूज अनकट प्रतिनिधी निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा