तातिन्सकी (रशिया), २३ नोव्हेंबर २०२०: “आता मला तलफ लागली रे” बऱ्याच वेळा हा डायलाॅग तुम्ही ऐकला असंल, नाहीतर स्वता मारला देखील असाल. पण, खरतर एखाद्या गोष्टीला किती आहारी जावं हे माणसांना समजल पाहीजे. अन्यथा ते अंगलट देखील येतं. आज प्रत्येकालाच कशाचं ना कशाचं व्यसन लागलं आहे आणि त्याची तलप ही त्याला काहीही करायला भाग पाडते. अशीच एक भयंकर घटना रशिया मधे घडली आहे.
आजच्या तरूणाईला व्यसन फार लवकर लागतं. बदलत्या आणि धावत्या वेळात तो काय करतो त्याचं त्याला भान राहत नाही.”एय मी कंट्रोल मधेच पितो डाॅण्टवरी” म्हणून वेळ मारून नेतात. रशियातील तातिन्सकी जिल्ह्यातील तोमतोर गावात एक पार्टी चालू होती आणि पार्टी सुरु आसताना दारूचा स्टाॅक संपला. पण, तरूणांची हौस मात्र फिटली नव्हती त्यांची तलफ वाढली आणि त्यामधे त्यांनी दारू ऐवजी सेनिटायझर प्यायलं.
सेनिटायझर पिलानं तीन तर त्या जागीच तडफडून मेले ज्यात एक ४१ वर्षांची महिला, २७ वर्षांचा आणि ५९ वर्षांचा पुरुष या तिघांचा समावेश होता. तर चार जणांनी हाॅस्पिटल मधे उपचारा दरम्यान आखेरचा श्वास घेतला आणि दोन जणं कोमात गेले आसून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. परदेशातच नाही तर भारतातील तळीराम देखील कमी नाहीत. लाॅकडाऊन चालू असताना दारू भेटली नाही म्हणून डायरेक्ट तळीरामांनी सेनिटायझर च्या बाटल्याच तोंडाला लावल्या होत्या आणि जीवला मुकले देखील.
व्यसन हे मानव जातीला लागलेली एक वाळवी आहे. ज्यामधे जाणारा व्यक्ती जातो. पण, मागं संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. पण जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात या बद्दल जनजागृती केली तरी व्यसनी मानव त्याला सोडायला तयारच होत नाही आणि मग काय “आता मला तलफ लागली रे”……
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव