नव्या उच्चांकावर सेंसेक्स, तर निफ्टी १३ हजारांच्या पार…

मुंबई, २४ नोव्हेंबर २०२०: कोरोना लस बनवण्याच्या बाबतीत सातत्यानं चांगली बातमी समोर येत आहे. कोरोना लस बनवण्यासाठी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी सह भागीदारीत लस बनवणाऱ्या एस्ट्राझेनेका’नं म्हंटलं आहे की चाचणी दरम्यान ही लस ९० टक्के प्रभावी ठरली आहे. या सकारात्मक बातमीमुळं भारतीय शेअर बाजार वाढला असून सेन्सेक्स-निफ्टी नव्या विक्रमाच्या पातळीवर पोहोचला आहे.

निफ्टी १३ हजारांच्या पलीकडं

आठवड्याच्या दुसर्‍या ट्रेडिंग दिवशी सेन्सेक्सनं सुमारे २५० अंकांची वाढ करुन ४४,३५० अंकांवर मुसंडी मारली, जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. निफ्टीबद्दल बोलायचं झालं तर प्रथमच निफ्टीनं देखील १३ हजाराची उच्चांक पातळी आजच्या ट्रेडिंग सेक्शन मध्ये गाठली आहे. निफ्टीची ही आत्तापर्यंतची सर्वात उच्च पातळी आहे.

बायोकोनच्या शेअर्समध्ये वाढ

बायोटेक कंपनी बॉयोकॉनचा शेअर जवळपास एक टक्का वाढला आणि तो ४२२ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. कंपनीनं म्हटलं आहे की, त्यांनी हिंदुजा रीन्युबल्स प्रायव्हेट लिमिटेड मधील हिस्सेदारी विकत घेतली आहे. कंपनीनं २६ टक्के भागभांडवल ५.९१ खोटे रुपयांमध्ये खरेदी करण्याचा करार केलाय. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत बॉयोकान कंपनीनं सांगितलं की, हे अधिग्रहण पूर्ण करण्यासाठी १५ डिसेंबर २०२० पर्यंत वेळ आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या कराराची किंमत ५,९१,६१,७३० रुपये आहे.

सोमवारीही बाजारात तेजी

सोमवारीही शेअर बाजारात वाढ दिसून आली. कालच्या ट्रेडिंग सेक्शन दरम्यान बीएसईचा सेन्सेक्स ४४,२७१ अंकांच्या उच्चांकावर पोहोचला. शेवटी, तो १९५ अंक म्हणजे ०.४४ टक्क्यांच्या वाढीसह ४४,०७७ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणं नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ६७ अंक म्हणजेच ०.५२ टक्क्यांच्या वाढीसह १२,९२६ अंकांवर बंद झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा