ह्युस्टन, २४ नोव्हेंबर २०२०: रेसलिंगचा दिग्गज अंडरटेकरनं डब्ल्यूडब्ल्यूई युनिव्हर्सला निरोप दिलाय. अंडरटेकरनं सर्व्हायव्हर सिरीज दरम्यान आपला हा निरोप दिला. रविवारी, ५५ वर्षीय अंडरटेकरनं आपल्या शैलीनुसार आणि पोशाखांसह आपल्या कारकीर्दीच्या काळातील शेवटचं पाऊल रिंग मध्ये ठेवलं.
एनाउंसर’नं रिंगमध्ये येऊन अंडरटेकरच्या निरोपची घोषणा केली. यानंतर अंडरटेकरनं रिंगमध्ये शानदार प्रवेश केला. यावेळी त्यानं त्याच्या कारकीर्दीबद्दल भाष्य केलं. तसंच, त्यानं सांगितलं की त्याची रेसलिंग मधील वेळ आता संपली आहे. ‘थँक्स यू टेकर’ असं म्हणत चाहत्यांनी त्याला निरोप दिला. या वेळी, टेकर स्वत: भावनिक झाला. यासह, तो डब्ल्यूडब्ल्यूई टेलिव्हिजनवरील सर्व्हायव्हर सीरिजमध्ये अंतिम वेळी दिसला.
तो रिंगमध्ये ‘अंडरटेकर’ म्हणून लोकप्रिय होता. त्याचं खरं नाव मार्क विल्यम कालावे आहे. त्याचा जन्म २४ मार्च १९६५ रोजी ह्यूस्टनमध्ये झाला होता. २२ नोव्हेंबर १९९० रोजी त्यानं सर्व्हायव्हर मालिकेतून डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये पदार्पण केलं. नुकत्याच एका मुलाखतीत अंडरटेकरनं सांगितलं की, आपल्या कारकिर्दीचा मला अभिमान आहे. ३० वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत त्यानं बरीच मोठी कामगिरी केली आहे. या खेळादरम्यान त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या नसण्याची खंत नेहमीच राहील
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे